Maharashtra Kusti : महाराष्ट्राच्या कुस्तीवैभवाला नवी झळाळी;शिवराज, हर्षवर्धनच्या कामगिरीनं नवचैतन्य
पुण्याचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर या दोन पैलवानांनी महाराष्ट्राच्या कुस्तीत जणू नवचैतन्य निर्माण केलं आहे. उत्तर प्रदेशमधल्या सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटात शिवराज राक्षेनं सुवर्णपदकाची कमाई केली. याच स्पर्धेतल्या ९७ किलो वजनी गटात हर्षवर्धन सदगीर हा रौप्यपदकाचा मानकरी ठरला. त्या दोघांनीही वरच्या वजनी गटात केलेली पदकांची ही कमाई महाराष्ट्राची आशा उंचावणारीय. पाहूयात आमचा प्रतिनिधी विजय साळवीनं शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीरशी साधलेला संवाद.