Maharashtra Kesari 2022 : आजपासून साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार ABP Majha

तमाम कुस्ती शौकिनांसाठी आनंदाची बातमी.... आजपासून साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. तब्बल ५९ वर्षांनंतर साताऱ्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचा मान मिळालाय. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावण्यासाठी ९०० पैलवान शड्डू ठोकून सज्ज आहेत.. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेले दोन वर्ष महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा झाली नव्हती... मात्र आता निर्बंधमुक्तीनंतर पुन्हा एकदा साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडणार आहे. त्यामुळे पैलवान आणि कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola