Lionel Messi : वयाच्या 10 व्या वर्षी गंभीर आजार, सर्व संकटावर केली मात, बनला फुटबॉलचा अनभिषिक्त सम्राट
जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाचा सर्वात प्रसिद्ध खेळाडू फुटबॉलपटू लिओनल मेस्सीनं (Lionel Messi) अखेर फिफा विश्वचषक उंचावला... फायनलच्या सामन्यात अर्जेंटिना संघानं फ्रान्सला मात देत फिफा वर्ल्ड कप 2022 आपल्या नावावर केला...विशेष म्हणजे 35 वर्षीय मेस्सीच्या निवृत्तीच्या चर्चा असल्यानं त्याचा हा अखेरचा विश्वचषक होता. जो त्यानं जिंकत आपल्या फुटबॉल कारकिर्दीतील एक मोठं स्वप्न पूर्ण केलं... पण हा इतिहास लिहिणारा मेस्सी याचा इथवरचा प्रवास तितकाच खडतर होता. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी एका गंभीर आजारानं त्याला ग्रासलं होतं. पण त्यावरही मात करत मेस्सी फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट बनला... क्लब फुटबॉल गाजवून अर्जेंटिनाला जागतिक फुटबॉलमध्ये अव्वल दर्जाचा संघ बनवण्यापासून विश्वचषक विजयापर्यंतच्या मेसीच्या प्रवासावर एक नजर फिरवू...
Tags :
Football Sports Lionel Messi FIFA World Cup 2022 FIFA WC 2022 Qatar Tournament Football World Cup 2022 FIFA 2022 Fifa World Cup Final ARG Vs FRA Argentina Vs France Fifa Final Lionel Messi Story