Who will win IPL? : आयपीएलचा किंग कोण? अहमदाबादमध्ये महामुकाबला
abp majha web team
Updated at:
29 May 2023 08:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल अहमदाबादमध्ये पावसाने हिरमोड केलेल्या आयपीएलच्या फायनल सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणाराय. चेन्नई विरुद्ध गुजरात टायनन्स यांच्यात ही लढत असून गुजरात सलग दुसऱ्या वर्षी बाजी मारणार की चेन्नई सुपर किंग्ज पाचव्यांदा विजयाची माळ घालणार, याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील फायनल होेतेय. खरं तर रविवारी स्टेडियम खच्चून भरलं होतं. पण ऐनवेळी पावसानं खेळ केला आणि दोन्ही टीम्ससह चाहत्यांच्या आशांवरही पाणी पडलं. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडल्यामुळे अखेर रविवारचा सामना रद्द करण्यात आला. आजचं अहमदाबादमधील वातावरण सध्या कोरडं असल्याने आज चौकार, षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करतायत.