Kapil Dev IPL 2023 Final Match : आजची रात्र फायनलची, धोनी आणि हार्दिकमध्ये कांटे की टक्कर

Continues below advertisement

IPL 2023 Final Match : आजची रात्र फायनलची, धोनी आणि हार्दिकमध्ये कांटे की टक्कर

पण अहमदाबादमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.  पावसामुळे सामन्याला उशीरा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण आज जर पाऊस थांबलाच नाही, तर आयपीएलकडून काही नियम तयार करण्यात आलेले आहे. आज जर कमीत कमी पाच षटकारांचा सामना झाला नाही. तर रिझर्व डेला सामना होणार आहे.  

रिझर्व डे सोमवारी ठेवण्यात आला आहे. आजही एकही चेंडू पडला नाही, तर फायनलचा थरार उद्या पाहायला मिळणार आहे. पण सोमवारीही पाऊस पडला तर विजेता कोण होणार ...याची उत्सुकता लागली आहे. जर सोमवारी पावसामुळे सामना झाला नाही.. गुजरातला विजेता घोषित करण्यात येणार... कारण, साखळी फेरीत गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. 

पावसामुळे सामना रद्द झाल्यास पुढे काय?
याशिवाय पावसामुळे सामन्यात विलंब झाल्यास आवश्यक 20 षटकांपैकी काही षटकांची संख्या कमी केली जाण्याचीही शक्यता आहे. यानुसार, प्रत्येक संघाला किमान पाच षटके फलंदाजी करण्याची संधी मिळेल. आजच्या सामन्यासाठीची शेवटची वेळ रात्री 12.26 वाजता असेल, त्यानंतरही सामना न झाल्यास हा सामना सोमवारी खेळवण्यात येईल. सोमवारीही पावसाने ख्वाडा घातल्यास गुजरातचा संघ विजेता होईल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram