IPL 2022 Retention : आयपीएलचे 8 संघ करणार रिटेन खेळाडूंची घोषणा, रिटेंशनचे नियम काय?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIPL 2022 Retention Live Streaming : जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL). ही भव्य स्पर्धा जरी वर्षातले काही महिने चालत असली तरी या स्पर्धेची हवा मात्र वर्षभर असते. आतातर लिलाव प्रक्रियेपूर्वी कोणता संघ, कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार? अर्थात रिटेन करणार यासाठीही विशेष प्रक्रिया पार पडणार आहे. आज म्हणजेच मंगळवारी (30 नोव्हेंबर) ही प्रक्रिया पार पडणार असून तुम्ही देखील लाईव्ह टीव्हीवर ही प्रक्रिया पाहू शकता...
आगामी आयपीएलमध्ये 8 च्या जागी 10 संघ खेलणार आहेत. लखनौ आणि अहमदाबाद हे संघ नव्याने सामिल झाले असून त्यांच यंदाच पहिलं वर्ष असल्याने ते आजच्या रिटेन प्रक्रियेत सामिल होणार नाहीत. दरम्यान इतर 8 संघ नेमकं कोणत्या 4 खेळाडूंना रिटेन करणार? याकडे सर्वांच लक्ष आहे. तर या सर्व प्रक्रियेचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्हीही घरबसल्या पाहू शकता.. कसा? ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.