IPL 2021 : दिल्ली की कोलकाता? चेन्नईशी अंतिम फेरीत कोण भिडणार याचा आज फैसला
Continues below advertisement
आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या अंतिम फेरीत चेन्नईविरोधात कोण भिडणार, याचा फैसला आज संध्याकाळी होणार आहे. पहिल्यांदाच आयपीएलचं जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या दिल्ली कॅपिटल्ससमोर कोलकाता नाइट रायडर्सचं आव्हान आहे. आज संध्याकाळच्या सामन्यातील विजेता अंतिम फेरीत धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जशी दोन हात करणार आहे.
Continues below advertisement