IPL 2021 PBKS vs RR : रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पंजाब किंग्जवर 2 धावांनी विजय
Continues below advertisement
पंजाब किंग्जला शेवटच्या षटकात विजयासाठी 4 धावांची गरज होती. पण कार्तिक त्यागीने शानदार गोलंदाजी करताना निकोलस पूरन आणि नंतर दीपक हुड्डाची विकेट घेतली आणि सामना पंजाबच्या हातातून हिसकावून घेतला. त्याने शेवटच्या षटकात फक्त एक धाव दिली. अशा प्रकारे राजस्थानने हा सामना 2 धावांनी जिंकला. पंजाब किंग्ज संघाला 186 धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण संघ निर्धारित 20 षटकांत चार गडी गमावून केवळ 183 धावा करू शकला.
Continues below advertisement