IPL 2020 Schedule | आयपीएलच्या तेराव्या मोसमातील सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, MI VS CSK सलामीची लढत!

दुबई - आयपीएलच्या तेराव्या मोसमाला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएल सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालंय. या वेळापत्रकानुसार गतविजेते मुंबई इंडियन्स आणि उपविजेते चेन्नई सुपर किंग्स संघांदरम्यान 19 सप्टेंबरला अबुधाबीत सलामीचा सामना रंगणार आहे.

यंदा कोरोनामुळे बीसीसीआयकडून आयपीएलचं आयोजन यूएईत करण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला सुरु होणारी ही स्पर्धा 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यात सुरुवातीला 19 सप्टेंबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत साखळी सामने, त्यानंतर क्वॉलिफायर, एलिमिनेशन राऊंड आणि 10 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola