Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचं सामान चोरीला, पुढील सामन्यात अडचण होऊ शकते

Continues below advertisement

आयपीएलच्या प्रत्येक सीझनमध्ये काही ना काही वाद हमखास होतात. यावेळी दिल्ली संघाच्या खेळाडूंचं सामान चोरीला गेलं आहे. यात कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या समानाचाही समावेश आहे. खेळाडूंच्या एकूण 16 बॅट्स चोरीला गेल्या आहेत. त्याशिवाय खेळाडूंकडील अन्य सामानही चोरी झालं आहे. सगळ्यात जास्त नुकसान यश ढुल याचं झालं असून त्याच्या पाच बॅट्स चोरीला गेल्या आहेत. मिचेल मार्शच्या दोन बॅट्स चोरी झाल्या आहेत. तर फिल सॉल्ट याच्याही तीन बॅट्स गायब आहेत. त्याखेरीज ग्लव्ह्ज, बूट आणि अन्य सामानही चोरीला गेलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू बेंगळुरूहून दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांना या चोरीचा शोध लागला. खेळाडूंनी आपल्या खोलीचा ताबा घेतला.. काही वेळानं त्यांचं सामान रूमवर पोहोचवण्य़ात तेव्हा त्यातील अनेक गोष्टी गायब असल्याचं आढळलं. या चोरीमुळे खेळाडूंना धक्का बसला आहे. यश आणि फिल यांच्या रेडी टू प्ले बॅट्स गायब असल्याने त्यांना आता पुढील सामन्यात अडचण होऊ शकते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram