Majha Vishesh : आयपीएल स्थगित करणं हे उशिराचं शहाणपण? BCCI ने कोरोनाचा धोका ओळखला नाही? माझा विशेष

IPL 2021 : यंदाच्या वर्षीची आयपीएल क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्याचं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं. एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. देशात कोरोनाचा वाढता धोका आणि सध्या आयपीएलमध्येही काही रुग्णांना या विषाणूची लागण झाल्यामुळं हा निर्णय़ घेण्यात आल्याचं कळत आहे. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार स्पर्धा तूर्तास स्थगित करण्यात आली असून, पुढील काळात त्यासाठीच्या नव्या तारखा जाहीर होऊ शकतात. पण, सध्या प्राधान्य हे खेळाडू आणि त्यांच्या आरोग्यालाच देण्यात आलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola