IPL Ticket : अहमदाबादमध्ये तिकीटसाठी झुंबड, तिकीटसाठी चेंगराचेंगरी : ABP Majha

Continues below advertisement

आयपीएलचे शेवटचे दोन्ही सामने गुजरातच्या अहमदाबादेत होणार आहेत... आणि या सामन्याच्या तिकिटांसाठी नरेंद्र मोदी स्टेडिअमबाहेर अक्षरशः झुंबड उडाल्याचं पाहायला मिळतंय... तिकीट मिळवण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय... क्वालिफायर 2 आणि फायनलचे सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहेत. धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईचा संघ फायनलमध्ये पोहचलाय. तर मुंबई आणि गुजरात यांच्यात क्वालिफायर 2 चा सामना होणार आहे. यातील विजेता संघ चेन्नईबरोबर होणार आहे. 26 मे रोजी क्वालिफायर तर 28 मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. या सामन्यांसाठी मोठ्या प्रमाणात चाहत्यांचा प्रतिसाद दिसतोय. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअबाहेर तिकिटासाठी तुडुंब गर्दी झाली होती. लोकांचा रोष पाहता सुरक्षेसाठी उपस्थित असलेले पोलिसही हतबल झाले होते.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram