Saniya Mirza : आगामी ऑस्ट्रेलियन ओपनसाठी सानिया मिर्झा दुबईत करणार सराव

भारताची टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झा आगामी टेनिस सीझनसाठी सज्ज झालीय. साल 2022 च्या सुरूवातीला रंगणा-या ऑस्ट्रेलियन ओपनसाठी सानियाची तयारी लवकरत सुरू होणार आहे. मंगळवारी मुंबईच्या वांद्रे परिसरात 'डी बिअर्स' या हि-यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रँडच्या नव्या शोरूमच्या उद्धाटनासाठी सानिया उपस्थित होती. येत्या एक-दोन दिवसांत ती दुबईसाठी रवाना होऊन तिथच आपली महिला दुहेरीतील साथीदारासह सानिया सरावाला सुरूवात करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली वर्ष दिड वर्ष काहीसं संथ झालेलं क्रिडाविश्वही आता रूळावर आलंय. बायोबबल मधला सराव, स्पर्धा यातनं आता क्रिडाविश्वही हळूहळू सारवू लागलंय असं सानियानं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. तसेच घरात आईवडील दोघंही खेळाडू असल्यानं सतत ते आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी विविध स्पर्धांसाठी जगभरात फिरत असतात. त्यामुळे घरात मुलांकडे लक्ष देणं ही जबाबदारी कुटुंबातील अन्य व्यक्तींवर असते. सानिया आणि शोएब मलिकही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे घरच्यांचा खूप सपोर्ट असल्याचंही सानिया मान्य करते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola