IND vs NZ : आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, पाहा कोणाकोणाला मिळाली आहे संधी ?

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेसाठी काल 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या अपयशी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, या मालिकेसाठी भारतीय संघांत नव्या चेहऱ्यांना अधिकाधिक संधी देण्यात आली. विश्वचषकानंतर भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहली पायउतार झाला आहे. त्याच्याऐवजी रोहित शर्माची टीम इंडियाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. सलामीचा लोकेश राहुल हा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. तर तीन टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेसाठी विराट कोहली, जसप्रीत बुमरा, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. आयपीएलचा यंदाचा मोसम गाजवणारा महाराष्ट्राचा वाघ ऋतुराज गायकवाडसह अष्टपैलू वेंकटेश अय्यर आणि हर्षल पटेलही यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांत 17, 19 आणि 29 नोव्हेंबरला अनुक्रमे जयपूर, रांची आणि कोलकात्यात ट्वेन्टी ट्वेन्टी सामना खेळवण्यात येईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola