India Vs zimbabwe : भारताचं झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 187 धावाचं आव्हान : ABP Majha
टी-२० विश्वचषक स्पर्धेत सुपरसंडेला मोठा उलटफेर पाहायला मिळाला... चोकर्स असा टॅग असणाऱ्या दक्षिण आफ्रिकन संघाने पुन्हा एकदा हाराकिरी केली... कुणाच्याही ध्यानीमनी नसताना नेदरलँड्सच्या ऑरेंज आर्मीने दक्षिण आफ्रिकेचा १० धावांनी धुव्वा उडवला.. या पराभवामुळे आफ्रिकेचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.. मात्र तिकडे पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये जल्लोष करण्यात आला.. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे या दोन्ही संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा पल्लवित झाल्यात... दुसरीकडे आफ्रिका आऊट झाल्याने भारतीय क्रिकेट संघानं उपांत्य फेरीत धडक मारलीय.. नेदरलँड-दक्षिण आफ्रिका सामन्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याची चर्चा रंगलीय.. सध्या पाकिस्तान आणि बांग्लादेशची लढाई सुरु आहे.. या सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत धडक मारेल.पाकिस्तान उपांत्य फेरीत गेल्यास टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १५ वर्षांनंतर महामुकाबला पाहायला मिळेल.. २००७ साली धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पहिल्या टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं होतं.. त्यामुळे भारत-पाकिस्तान अंतिम सामना होणार का.. रोहितसेना पाकिस्तानला धूळ चारुन विश्वचषकावर नाव कोरणार का अशा चर्चा आता क्रिकेट चाहत्यांमध्ये सुुरु झाल्यात..