India beats Japan in Hockey : हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताने उडवला जपानचा धुव्वा, 8-0नं जिंकला सामना
abp majha web team
Updated at:
27 Jan 2023 10:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहॉकी वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने जपानचा 8-0 ने धुव्वा उडवलाय. भारतीय संघाच्या विजयाची पहिली वीट मनदीप सिंगच्या गोलने रचली गेली. तर, दुसऱ्या हाफमध्ये टीम इंडियाने चमकदार कामगिरी करून दाखवलीय. दुसऱ्या हाफमध्ये अवघ्या दुसऱ्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या पेनल्टी कॉर्नरवर मनदीप सिंगने कोणतीही चूक करणं टाळलंय. तर 35व्या मिनिटाला अभिषेकने गोल केल्यामुळे भारताची आगेकूच सुरूच राहिली. यानंतर टीम इंडियाने सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात अवघ्या 40 सेकंद आधी आठवा गोल केला. आणि भारतीय संघाने जपानचा 8-0 असा सहज पराभव केला.