India Australia यांच्यातील क्रिकेटच्या चौथा आणि निर्णायक कसोटी सामना, पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती

Continues below advertisement

आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटच्या चौथा आणि निर्णायक कसोटी सामन्याला सुरुवात होतेय... अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होतोय... आणि हा सामना पाहायला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित नरेेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत... सामना सुरू होण्याआधी मैदानात भारतीय संस्कृतीचं दर्शन देणारे काही सांस्कृीत कार्यक्रम सादर झाले.. ... दरम्यान भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अखेरचा कसोटी सामना जिंकत मालिकेत ३-१ अशी सरशी साधल्यास ते जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील... त्यामुळे हा कसोटी सामना भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे... सध्या भारताकडे २-१ अशी आघाडी आहे.. तर ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या विजयासह मालिका २-२ अशा बरोबरीत संपवण्याचा प्रयत्न असेल.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram