IND Vs SA 2nd TEST : कसोटीसह मालिका खिशात घालण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील सेन्च्युरियनमधली पहिली कसोटी जिंकून भारतानं १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जोहान्सबर्ग कसोटी जिंकून ऐतिहासिक मालिका विजय साजरा करण्याची संधी टीम इंडियासमोर आहे.