IND vs AUS T20 2022 : ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या टी -20 मालिकेला आजपासून सुरुवात : ABP Majha

ऑस्ट्रेलियात सुरु होणाऱ्या टी-२० क्रिकेट विश्वचषकासाठी महिन्याभरापेक्षाही कमी कालावधी उरलाय.. त्यामुळे या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या रंगीत तालमीचा आजपासून शुभारंभ होतोय... ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला मोहालीत सुरुवात होतेय.. ही मालिका म्हणजे टी-२० विश्वचषकासाठी नेट प्रॅक्टिस असल्याचे बोललं जातंय.. त्यामुळे या मालिकेत टीम इंडियाच्या मधल्या फळीच्या फलंदाजांच्या कामगिरीवर साऱ्यांचं लक्ष असेल.... तसंच या मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीप बुमरा आणि हर्षल पटेलचं संघात पुनरागमन झालंय... या दोघांच्या कामगिरीकडेही साऱ्यांचं लक्ष असेल.. तिकडे ऑस्ट्रेलियानंही वॉर्नर, स्टॉयनिस, स्टार्क, मिशेल मार्श यांना विश्रांती दिलीय.. त्यामुळे या मालिकेत कोण वरचढ ठरणार याकडं लक्ष लागलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola