#RitikaPhogat Suicide | राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत एका पॉईंटने हरल्याने रितिका फोगाटची आत्महत्या

Ritika Phogat : दंगल गर्ल गीता फोगट आणि बबीता फोगाटची मामेबहीण असलेल्या रितिका फोगाटने आत्महत्या केली आहे. राज्यस्तरीय कुस्तीच्या अंतिम सामन्यात केवळ एका गुणाने झालेला पराभव सहन करता न आल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येने कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली आहे.  कुस्ती क्षेत्रात फोगाट कुटुंबाने नाव कमावलं आहे. रितिकाच्या आत्महत्येने त्यांना मोठा धक्का बसल्याचं सांगण्यात येतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola