England register highest ODI score : इंग्लंड संघानं उभारली 'वन डे'तील सर्वोच्च धावसंख्या ABP Majha

Continues below advertisement

ऑईन मॉर्गनच्या इंग्लंड संघानं आज क्रिकेटच्या मैदानात इतिहास घडवला. इंग्लंडनं नेदरलँडविरुद्धच्या वन डे सामन्यात ४ बाद ४९८ धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडनं उभारलेली वन डेतली ही आजवरची सर्वाधिक धावसंख्या ठरली.  इंग्लंडकडून जॉस बटलरनं १६२, डेविड मलाननं १२५, पीटर सॉल्टनं १२२ आणि लिव्हिंगस्टोननं नाबाद ६६ धावा कुटून नेदरलँडच्या गोलंदाजीची अक्षरश: लक्तरं काढली. या सामन्यात इंग्लंडनं तब्बल ३६ चौकार आणि २६ षटकारांचा पाऊस पाडला. अखेरीस इंग्लंडनं हा सामना २३२ धावांनी जिंकला. दरम्यान वन डेत सर्वाधिक धावांचा याआधीचा विक्रमही इंग्लंडच्या नावावर होता. २०१८ साली इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४८१ धावा केल्या होत्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram