Dinesh Lad on Rohit Sharma :'आज टीम इंडियाच जिंकणार', रोहितचे कोच दिनेश लाड यांचा विश्वास
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDinesh Lad on Rohit Sharma World Cup 2023 : इंडियाच जिंकणार, कोच दिनेश लाड यांनी व्यक्त केला विश्वास
रोहित शर्मा आणि खेळाडू शार्दूल ठाकूरचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूरचे काही किस्से देखील त्यांनी सांगितलेत... तसंच भारतीय संघच विश्चषक जिंकेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे. रम्यान प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी.
टीम इंडियाच्या खांद्यावर देशभरातील अब्जावधी लोकांच्या अपेक्षांचं ओझं आहे. अशातच रोहितसेना प्रचंड मोठ्या दबावाखाली असणार हे मात्र नक्की. पण अशातच कर्मधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या दोघांनाही विश्वास आहे की, टीम इंडिया देशवासियांची मनं अजिबात मोडणार नाही. रोहितनं नाणेफेक जिंकून योग्य निर्णय घ्यावा, अशी प्रार्थना सध्या प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहता करतोय. वानखेडेच्या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ फ्लडलाईटमध्ये झटपट विकेट गमावत असल्याचं आपण यापूर्वीच्या सामन्यांमध्ये पाहिलं आहे. कारण नवीन चेंडूला जबरदस्त स्विंग मिळतो. टीम इंडिया आणि न्यूझीलंडचे गोलंदाज नव्या चेंडूनं खेळताना प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे सलामीवीर रोहित आणि शुभमन गिल यांच्यावर बरंच काही अवलंबून असेल.