Shardul Thakur : CSK संघाचं शार्दुल ठाकूरच्या वाढदिवसानिमित्त ड्रेसिंग रुममध्ये जोरदार सेलिब्रेशन
IPL 2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला 193 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून कोलकाता संघ निर्धारित 20 मध्ये 9 विकेट गमावून फक्त 165 धावा करू शकला. या विजयाचं तर संघाकडून सेलिब्रेशन झालंच परंतु आज शार्दुल ठाकुरचा वाढदिवस आहे आणि त्याचं ही सेलिब्रेशन कालच CSK संघाकडून करण्यात आलं.