Wankhede Stadium | विलगीकरण सेंटरसाठी वानखेडे स्टेडियम ताब्यात द्या; BMCचं MCAला पत्र

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्यांमध्ये वाढ होतेय. मुंबईत वाढत्या रुग्ण संख्येसमोर आता जागा अपुरी पडत आहे. यामुळं आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण वाढला आहे. यासाठीच मुंबई महानगरपालिकेने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) वानखेडे स्टेडियमचा तात्पुरता ताबा देण्याची मागणी केली आहे.
वानखेडे स्टेडियमचे रुपांतर महापालिकेच्या आपत्कालीन कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी आणि कोरोना व्हायरस एसिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह रूग्णांना  वेगळे ठेवण्यासाठी एक सेंटर बनवण्याचा बीएमसीचा मानस आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola