Kapil Dev on Virat Kohli : विराट कोहलीनं अहंकार सोडून युवा नेतृत्वाखाली खेळावं, कपिल देव यांचा सल्ला

कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीनं अहंकार सोडून युवा नेतृत्वाखाली खेळावं असा सल्ला भारताचे माजी विश्वविजयी कर्णधार कपिल देव यांनी दिलाय. कर्णधारपदाचा राजीनामा दिलेला विराट कोहली याची संघनिष्ठा आणि खेळाबद्दलच्या प्रेमाबद्दल कोणीही शंका घेऊ शकणार नाही. पण आता कर्णधारपद सोडल्यावर त्याने आपला अहंकारही सोडून टीम इंडियाच्या भल्यासाठी नव्या कर्णधाराला मदत करावी, असं कपिल देव यांनी म्हटलंय. एक सर्वोत्तम फलंदाज म्हणून आपण विराटला गमावणे योग्य ठरणार नाही. आता विराटने एक खेळाडू म्हणून मुक्तपणे आपला नैसर्गिक खेळ करून संघाला पुन्हा क्रिकेट जगतात टॉपवर न्यावे ,असा वडिलकीचा सल्ला कपिल देव यांनी विराट कोहलीला दिलाय. आपल्या कर्णधार असताना सुनील गावस्कर खेळत होते याचीही आठवण त्यांनी करून दिली.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola