T20 World Cup : भारताने स्कॉटलँडला तर हरवलं, आता उपांत्य फेरीचं गणित कसं असणार?
Continues below advertisement
दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने स्कॉटलँडवर 8 विकेट अन् 13.3 षटकं राखून मोठा विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने स्कॉटलँडच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करीत स्कॉटलँडच्या संघाला केवळ 85 धावांवरच गुडांळले. या लक्ष्याचा पाठला करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीवीरांनी 6.3 षटकातच संघाला विजय मिळवून दिलाय. भारताने स्कॉटलँडचा सहज पराभव केला. मात्र उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारताला अफगणिस्तान आणि न्यूझीलंडविरोधातील सामन्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. त्याशिवाय अखेरच्या सामन्यात नेट रनरेटही वाढवावा लागेल.
Continues below advertisement