T 20 World Cup : Zimbabweची पाकिस्तानवर एका धावेनं मात, लागोपाठ दुसऱ्या सामन्यात Pakistan चा पराभव
Continues below advertisement
बाबर आझमच्या पाकिस्तानला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात लागोपाठ दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारण्याची लाजिरवाणी वेळ आली. पर्थमधल्या सामन्यात झिम्बाब्वेनं पाकिस्तानवर एका धावेनं निसटती मात केली. या सामन्यात झिम्बाब्वेनं पाकिस्तानला विजयासाठी अवघं 131 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पाकिस्तानला 20 षटकांत सहा बाद 129 धावांची मजल मारता आली. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला टीम इंडियाकडून हार स्वीकारावी लागली होती. त्यापाठोपाठ आता झिम्बाब्वेकडूनही झालेल्या पराभवामुळं पाकिस्तानच्या विश्वचषकातल्या आव्हानाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Continues below advertisement