IND vs SA 2nd Test : रहाणे-पुजाराची अर्धशतकं, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांची गरज

Continues below advertisement

India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा दुसरा डाव आटोपला आहे. भारत 266 धावांवर सर्वबाद झाला असून त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांची गरज आहे. भारताच्या दुसऱ्या डावात अनुभवी रहाणे आणि पुजारा यांनी अर्धशतकं झळकावली असून विहारीने नाबाद 40 धावा केल्यामुळे भारताने ही धावसंख्या उभारली आहे.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram