Smriti Mandhana : वेस्ट इंडीज विरोधात स्मृती मानधनाचं दमदार शतक ABP Majha

ICC Women's World Cup 2022: हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्कवर (Seddon Park) सुरू असलेल्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडीज (Ind Vs WI) संघासमोर 318 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामीवीर स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौरनं वेस्ट इंडीजच्या आक्रमक फलंदाजी केली. ज्यामुळं भारताला वेस्ट इंडीजच्या संघासमोर विशाल लक्ष्य ठेवता आलं आहे. वेस्ट इंडीजचा संघ आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यामुळं आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाज कशी कामगिरी बजावतात? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola