Shubhaman Gill : शुभमन गिलचा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज नेट्समध्ये फलंदाजीचा सराव
भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल डेंग्यूच्या आजारातून सावरला आहे. चेन्नईत विश्रांती घेऊन तो कालच अहमदाबादमध्ये दाखल झाला होता. पण बातमी अशी आहे की, शुभमन गिलनं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज नेट्समध्ये फलंदाजीचा सरावही केला. भारत आणि पाकिस्तान संघांमधला विश्वचषकाचा सामना दोन दिवसांवर आलेला असताना गिलनं फलंदाजीचा केलेला सराव हे चांगलं लक्षण मानलं जात आहे.
Tags :
Shubman Gill Ahmedabad Chennai Batsman News Rest Dengue India Salami Narendra Modi Stadium Nets Batting Practice