Priya Saroj Rinku Singh : 'सिक्सर किंग' ची खासदार 'क्वीन', सपा खासदार प्रिया सरोजशी रिंकूचा साखरपुडा
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा फिनिशर रिंकू सिंग लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. रिंकू आणि त्याची खासदार मैत्रीण प्रिया सरोज यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. पण आयपीएलमध्ये एकाच षटकात पाच सिक्स ठोकून हीरो सिक्सर किंग बनलेल्या रिंकूला ही खासदार क्वीन कुठे भेटली? पाहूयात हा खास रिपोर्ट...
एका विवाहसोहळ्यात झालेली ओळख ...
एका विवाहापर्यंत येऊन पोहोचलीये
ही कहाणी आहे क्रिकेटर रिंकू सिंगची.... रिंकू सिंगनं आणि प्रिया सरोज या दोघांचा नुकताच साखरपुडा पार पडला आणि एका नव्या नात्याची सुरुवात झाली... पण तुम्हाला माहितीये...? रिंकू सिंगची होणारी बायको एका पक्षाची खासदार आहे...
साखरपुड्याच्या सोहळ्यात रिंकूने प्रियाच्या बोटात जेव्हा अंगठी घातली तेव्हा प्रिया भावूक झाली होती... नव्या प्रवासाचा हा आनंद प्रियाच्या डोळ्यातून वाहत होता
बरीच दिग्गज मंडळी या क्षणाचे साक्षीदार होते...