Rohit Sharma : रोहित शर्माकडे टी-20पाठोपाठ वन डे संघाचंही कर्णधारपद ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Dec 2021 08:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताच्या वन डे संघाच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून विराट कोहलीला मुक्त करण्यात आलं आहे. त्याच्याऐवजी मुंबईच्या रोहित शर्माची भारताच्या वन डे संघांचा कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून रोहित हा भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघाचा कर्णधार आहे. पण आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यानिमित्तानं भारताच्या कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाची धुराही रोहितच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळं आगामी काळात रोहित शर्मावर तिहेरी जबाबदारी पाहायला मिळेल. दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात अजिंक्य रहाणेला कायम ठेवण्यात आलं आहे.