Retired Hurt Shubman Gill : शुभमन गिलला पायात गोळे आल्यानं तात्पुरतं रिटायर्ड होण्याची वेळ
न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक उपांत्य सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिलला पायात गोळे आल्यानं तात्पुरतं रिटायर्ड होण्याची वेळ आली. भारताच्या सुदैवान तो पुन्हा फलंदाजीला उतरू शकतो. दरम्यान, गिल निवृत्त झाला, त्यावेळी भारतानं एक बाद १६४ धावांची मजल मारली होती. आणि शुभमन गिल ७९ धावांवर खेळत होता.