Ravindra Jadeja : अष्टपैलू रवींद्र जाडेजाची विक्रमी खेळी, काही वर्षांपूर्वी व्यक्त केलेली इच्छापूर्ण

टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्धची मोहाली कसोटी तिसऱ्याच दिवशी जिंकली. आणि ही कसोटी जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली ती अष्टपैलू रवींद्र जाडेजानं. जाडेजानं नाबाद शतक आणि सामन्यात 9 विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला. त्यामुळे मोहालीची मोहीम भारतानं लिलया सर केली. पण या कामगिरीनंतर जाडेजाच्या एका मुलाखतीतलं विधान चर्चेत आलंय. नेमकं काय म्हटलं होतं जाडेजानं आणि मोहालीत त्यानं काय कमाल केली? पाहूयात आमचा प्रतिनिधी सिद्धेश कानसेच्या या रिपोर्टमधून...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola