Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Ranji Trophy Final : मध्य प्रदेशचा उडवला धुव्वा, विदर्भाची फायनलमध्ये थेट मुंबई संघाशी धडक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRanji Trophy Final : उपांत्य सामन्यात विदर्भाच्या संघानं मध्य प्रदेशचा 62 धावांनी धुव्वा उडवत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. आता रविवारी वानखेडे मैदानावर मुंबई आणि विदर्भाच्या संघात फायनलचा थरार रंगणार आहे. मुंबईने तामिळनाडूचा पराभव करत फायनलचं तिकिट पक्कं केले होतं. आज विदर्भानं फायनलमध्ये धडक मारली. विदर्भाकडून यश राठोड यानं शानदार शतकी खेळी केली होती, त्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
विदर्भानं पहिल्या डावात फक्त 170 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल मध्य प्रदेशनं 252 धावांपर्यंत मजल मारत आघाडी घेतली होती. पण विदर्भानं दुसऱ्या डावात शानदार कमबॅक केले. विदर्भानं दुसऱ्या डावात 402 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर मध्य प्रदेशला 258 धावांत गुंडाळलं. मध्य प्रदेशचे दिग्गज फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.