Rahul Dravid : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज
Continues below advertisement
भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी औपचारिक अर्ज केल्याची बातमी एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. त्यामुळं रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी द्रविडची निवड होणार, हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे. दुबईतल्या आयपीएल फायनलच्या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षकपदाची दिलेली ऑफर स्वीकारण्यास राहुल द्रविडनं मंजुरी दिली होती. बीसीसीआयच्या नॅशनल क्रिेकेट अॅकॅडमीच्या संचालकपदाची जबाबदारी ही सध्या द्रविडच्या खांद्यावर असून, द्रविड यांच्यानंतर ती सूत्रं माजी कसोटीवीर व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या हातात जाण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement