PAK VS AUS : पाकिस्तानसमोर ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान, टी20 विश्वचषकात आज दुसरी उपांत्य लढत
Continues below advertisement
ICC T20 WC 2021, PAK vs AUS Preview: टी-20 विश्वचषक 2021 चा दुसरा सेमीफायनल आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबई आंतराराष्ट्रीय मैदानावर खेळला जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. पाकिस्तानचं नेतृत्व युवा खेळाडू बाबर आझम करीत आहे. तर, ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद आरोन फिंचकडं सोपवलं गेलंय. दोन्ही संघाकडं सक्षम खेळाडू आहेत. यामुळं आजचा सामना क्रिकेट प्रेक्षकांसाठी रंगतदार ठरणार आहे. दरम्यान, पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघानं इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत धडक दिलीय. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी खेळणार आहे.
Continues below advertisement