IND vs NZ : न्यूझीलंड कसोटीचा किंग! भारताला 8 विकेट्सनं हरवून जिंकली कसोटी अजिंक्यपदाची मानाची गदा
Continues below advertisement
WTC 2021, 2 Innings Highlight: न्यूझीलँड जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव करत न्यूझीलँड संघानं पहिल्या कसोटी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. भारताचा दुसरा डाव 170 धावांवर गुंडाळला गेल्यानं न्यूझीलँडला 139 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान न्यूझीलँडच्या संघानं 8 गडी राखून पार केलं. न्यूझीलँडकडून कर्णधार केन विलियमसन आणि रॉस टेलरनं विजयी खेळी केली. विलियमसननं शानदार अर्धशतक ठोकत 52 धावा केल्या तर टेलरनं 47 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
Continues below advertisement
Tags :
New Zealand India Vs New Zealand ICC World Test Championship World Test Championship WTC WTC 2021