MS Dhoni Memorial Wankhede Stadium : 2011 ला धोनीनं मारलेला षटकार स्मृती फलकातून अजरामर होणार

Continues below advertisement

MS Dhoni Memorial Wankhede Stadium : 2011 ला धोनीनं मारलेला षटकार स्मृती फलकातून अजरामर होणार

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं २०११ साली वानखेडे स्टेडियमवरच्या विश्वचषक अंतिम सामन्यात ठोकलेल्या निर्णायक षटकाराची आठवण प्रत्येक भारतीयाच्या मनात आजही कायम आहे. याच आठवणीचं कायमस्वरुपी जतन करुन ठेवण्यात येणारेय. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी ही घोषणा केलीय. धोनीच्या त्या विजयी षटकारानंतर चेंडू वानखेडे स्टेडियमच्या विठ्ठल दिवेचा स्टॅंडमध्ये जिथं पडला, त्या खुर्च्यांच्या ठिकाणी धोनीच्या नावानं भारताच्या विश्वचषक विजयाचा स्मृतिफलक  उभारण्यात येणारेय. आयपीएलच्या रणांगणात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांमधला सामना येत्या शनिवारी खेळवण्यात येणारेय. त्या सामन्यानिमित्तानं एमसीएच्या वतीनं धोनीचा वानखेडे स्टेडियममधल्या त्याच ऐतिहासिक जागेवर सन्मानही करण्यात येणारे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram