Mohammed Shami Abuse Update : सोशल मीडियावर ट्रोल झालेल्या शमीची आजी-माजी क्रिकेटपटूंकडून पाठराखण

Continues below advertisement

Mohammed Shami Abuse Update : दुबई येथे झालेल्या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभावला सामोरं जावं लागलं. पाकिस्तान संघानं भारतीय संघाचा दहा विकेटनं पराभव केला. भारतीय संघाच्या पराभवानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. भारतानं हा सामना गमावल्यावर भारतीय संघातल्या एकमेव  खेळाडूवरच टीका होऊ लागली आहे. शमीला धर्मावरून सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे, त्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या बचावासाठी पुढे आले आहेत

सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग आणि हरभजनसिंग यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटू आता मोहम्मद शमीची पाठराखण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात टीम इंडियाला पाकिस्तानकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर काही समाजकंटकांकडून शमीला धार्मिक मुद्यावर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. सचिन, सहवाग आणि हरभजनसह इरफान पठाण आणि युजवेंद्र चहल यांनीही आवाज उठवून शमीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram