Wankhede Stadium : MS Dhoni नं ठोकलेल्या विजयी षटकाराची आठवण म्हणून वानखेडे स्टेडियमवर विशेष कक्ष

विश्वचषकाच्या रणांगणात रोहित शर्माच्या भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्धचा साखळी सामना दोन नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या साखळी सामन्याच्या निमित्तानं २०११ सालच्या विश्वचषक फायनलच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. २०११ सालच्या विश्वचषकाची फायनल ही भारत आणि श्रीलंका संघांत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आली होती. त्या अंतिम सामन्यात भारताचा तत्कालिन कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ठोकलेल्या विजयी षटकाराची आठवण मुंबई क्रिकेट असोसिएशननं आता कायमस्वरुपी जतन करून ठेवली आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी अमेय राणेचा रिपोर्ट.  

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola