Sachin Tendulkar Statue : वानखेडे स्टेडियमवर MCA उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSachin Tendulkar Statue : वानखेडे स्टेडियमवर MCA उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा ABP Majha
सचिन तेंडुलकरच्या ५०व्या वाढदिवसाचं मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ग्रॅंड सेलिब्रेशन. सचिनच्या वाढदिवशी २४ एप्रिलला किंवा यंदा वन डे विश्वचषक सामन्यादरम्यान पुतळ्याचं अनावरण. वानखेडे स्टेडियमवर एमसीए उभारणार सचिनचा पूर्णाकृती पुतळा. एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे आज घोषणा करण्याची शक्यता. वानखेडेवर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांच्या नावानं स्टॅंड आहेत. कॉर्पोरेट बॉक्सलाही गावस्करांचं नाव देण्यात आलं आहे. पण वानखेडेवर पूर्णाकृती पुतळा घडवण्यात येणारा सचिन हा पहिला क्रिकेटर. सचिनचं २०० कसोटी, ४६३ वन डे आणि एका ट्वेन्टी२० सामन्यात प्रतिनिधित्व. सचिनच्या खात्यात १०० आंतरराष्ट्रीय शतकं आणि ३४ हजार ३५७ धावा.