Krunal Pandya : कृणाल पंड्याला कोरोनाची लागण, आज होणारा भारत - श्रीलंका सामना लांबणीवर ABP Majha

IND vs SL T20 Postponed : भारत आणि श्रीलंका दरम्यान खेळवण्यात येणार दुसरा टी-20 सामना स्थगित करण्यात आला आहे. क्रुणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्याने हा सामना स्थगित करण्यात आला आहे. तसेच भारत आणि श्रीलंकेच्या संघानी आयसोलेट केले आहे. बीसीसीआयनने ट्वीट करत याची माहिती दिली आहे.

सध्या दोन्ही संघाच्या खेळाडूंची आणि स्टाफची चाचणी सुरू आहे. आता हा सामना उद्या (28 जुलैला) होणार आहे. भारताने या अगोदरचा पहिला सामना जिंकला आहे. परंतु आता मालिकेवर कोरोनाचे संकट आहे. रविवारी खेळवण्यात आलेल्या टी20 सामन्यात भारताने श्रीलंकेला 38 धावांनी हरविले होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola