IPL Lucknow Team : आयपीएलच्या लखनऊ संघाचं नाव ठरलं, 'लखनऊ सुपर जायंट्स' खेळण्यास सज्ज
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLucknow Super Giants Update : आयपीएल 2022 मध्ये दोन नवे संघ जोडले जाणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघाच्या सहभागामुळे यंदा आयपीएलमध्ये दहा संघ असणार आहेत. लखनौ संघाचं कर्णधारपद राहुलकडे सोपवण्यात आलं आहे. लखनौ संघाची मालकी आरपी संजीव गोयंका ग्रुपकडे आहे. या संघाच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात आली आहे. लखनौ संघाने आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावर केली आहे.
संजीव गोयंका यांच्या या नव्या संघाचं नाव लखनऊ सुपर जायंट्स असे असणार आहे. लखनऊ फ्रेंचायझीने चाहत्यांना आपल्या संघाचं नाव सुचवण्याची विनंती केली होती. सोमवारी सायंकाळी लखनौ फ्रेंचायझीचे मालक डॉ. संजीव गोयंका यांनी एका व्हिडिओद्वारे नावाची घोषणा केली आहे. तसेच संघाचं नाव सुचवल्याबद्दल चाहत्यांचे आभारही त्यांनी व्यक्त केले आहेत. ज्याच्या नावाच्या आधारावर संघाचं नाव निवडण्यात आलेय, त्याला दहा लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे., असे गोयंका यांनी सांगितले. दरम्यान, 2017 मध्ये आरपी गोयंका ग्रुपने पुण्याचा संघ विकत घेतला होता. या संघाचे नाव रायझिंग पुणे सुपरजायंट्स ठेवण्यात आले होते. याच नावाशी मिळतं जुळतं नाव लखनौ संघाचं ठेवण्यात आले आहे.