IPL ने बनादी जोडी! Deepak Chahar नं गर्लफ्रेंडला क्रिकेट स्टेडियममध्येच घातली लग्नाची मागणी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDeepak Chahar : आयपीएल 2021 मध्ये गुरुवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात पंजाब किंग्सनं चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. पण हा सामना संपल्यानंतर मैदानात एक खास क्षण पाहण्याची संधी सर्वांना मिळाली. चेन्नई सुपर किंग्सचा स्टार गोलंदाज दीपक चाहरनं स्टेडिअममधील स्टँड्समध्ये आपली गर्लफ्रेंड जया भारद्वाजला सर्वांसमोर प्रपोज केलं. हा क्षण पाहून उपस्थित प्रत्येकजण आश्चर्यचकीत झाले होते. सध्या हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
सामना संपताच दीपक चाहर स्टँड्समध्ये गेला आणि आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केला. दीपक चाहरनं गुडघ्यावर बसून आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. यावेळी, आजूबाजूला उभ्या असणाऱ्या लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोघांनाही शुभेच्छा दिल्या. जेव्हा दीपकला जयानं होकार दिला, त्यावेळी दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली.