IPL 2024 Final KKR vs SRH : हैदराबादचा उडवला धुव्वा... कोलकाताकडे तिसऱ्यांदा विजेतेपद

Continues below advertisement

SRH vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 च्या चषकावर नाव कोरले आहे. कोलकात्याने हैदराबादचा आठ विकेट आणि 57 धावांनी पराभव केला. हैदराबादने दिलेले माफक आव्हान कोलकात्याने दोन विकेट आणि 63 चेंडूमध्ये सहज पार केले. कोलकात्याकडून वेंकेटेश अय्यर याने नाबाद अर्धशतक ठोकले. कोलकात्याने तिसऱ्यांदा चषकावर नाव कोरले, याआधी 2012 आणि 2014 मध्ये कोलकात्याने चषकावर नाव कोरले होते. 

हैदराबादने दिलेल्या 114 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. सुनिल नारायण फक्त 6 धावा काढून बाद झाला. पॅट कमिन्स याने त्याला दुसऱ्याच षटकात तंबूत धाडले. त्यानंतर गुरबाज आणि वेंकटेश अय्यर यांनी हैदराबादची गोलंदाजी फोडली. दोघांनी 45 चेंडूमध्ये 91 धावांची शानदार भागिदारी केली. गुरबाजने 32 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने 2 षटकार आणि पाच चौकार ठोकले. शाहबाद अहमद याने गुरबाजला बाद केले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अखेरीस श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. हैदराबादची गोलंदाजी फ्लॉप ठरली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram