T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची आज घोषणा होण्याची शक्यता; 'या' जागांसाठी चुरस

Continues below advertisement

T20 World Cup: पाच वर्षांनतर होऊ घातलेल्या आयसीसी टी20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup)आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची (Indian Team) निवड झाली आहे. संघाची घोषणा आज सायंकाळी किंवा उद्या होऊ शकते. टी20 वर्ल्ड कपच्या संघ निवडीसाठी चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखाली आज निवड समितीची व्हर्चुअल बैठक होणार आहे. या बैठकीला कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री देखील असतील.  या बैठकीनंतर संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.  

आयसीसीनं टीमची घोषणा करण्यासाठी 9 सप्टेंबरची डेडलाईन निश्चित केली होती. टीम इंडियाची घोषणा आज इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी निकालावर अवलंबून असल्याचं बोललं जात होतं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram