IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा विजय
(IND vs BAN Test) यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-0 असा कडक विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार म्हणून केएल राहुलने संघाचं नेतृत्व केलं. भारताने मालिकाही जिंकली तरी देखील राहुलने संपूर्ण मालिकेत अत्यंत खराब प्रदर्शन केल्यानं त्याला ट्रोलिंगचा धनी व्हावं लागलं आहे. संघाचे नेतृत्व करणारा केएल राहुल फलंदाजीत पूर्णपणे अपयशी दिसला, त्याने दोन्ही सामन्यांच्या एकूण 4 डावात केवळ 57 धावा केल्या.