India Vs Pakistan T20 WC : टी 20 विश्वचषकात पाकिस्तानची भारतावर पहिल्यांदाचं मात ABP Majha

Continues below advertisement

आयसीसी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या इतिहासात टीम इंडियाला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून हार स्वीकारावी लागली. दुबईत झालेल्या दुसऱ्या गटाच्या सामन्यात पाकिस्ताननं भारताचा १० विकेट्सनी पराभव केला. विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं पाकिस्तानसमोर विजयासाठी १५२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताला पहिल्यांदा हरवण्याची कामगिरी बजावली. पाकिस्तानच्या या विजयाचा पाया डावखुरा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीनं रचला. त्यानं ३१ धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram