India vs Australia | अखेर Sydney Test अनिर्णीत; अश्विन आणि विहारीची झुंजार फलंदाजी

Continues below advertisement

सिडनी : हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या चिवट खेळीमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. आर अश्विनने 128 आणि हनुमा विहारीने 161 चेंडू खेळून काढले. त्यामुळे भारताने या सामन्यात पराभव टाळला. विशेष म्हणजे दुखापत होऊनही हनुमा विहारीने 161 चेंडू खेळला. हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या स्वप्नांवर विहारी आणि अश्विन यांनी विरजण टाकलं. परिणामी बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 1-1 असे बरोबरीत आहेत.

रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार खेळीमुळे विजय दृष्टीक्षेपात होता. विजयासाठी 157 धावांची गरज असताना रिषभ पंत 97 धावांवर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा 77 धावांवर माघारी परतला. त्यामुळे विजयाची आस लागलेल्या भारतीय संघाला हा सामना वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. पराभव टाळण्यासाठी भारताला विकेट्स जाऊ न देता उर्वरित षटकं खेळून काढायची होती. हे काम हनुमा विहारी आणि आर अश्विनने फत्ते केलं.

सिडनीमध्ये ऐतिहासिक कसोटी सामना रंगला. भारताला दुसऱ्या डावात 132 चेंडूंमध्ये 407 धावांचं आव्हान मिळालं होतं. भारताने 131 षटकं फलंदाजी करत 5 विकेट्सच्या मोबदल्यात 338 धावा केल्या. हेमस्ट्रिंग इंज्युरी असतानाही हनुमा विहारीने 161 चेंडूंचा सामना करत 23 धावांची नाबाद खेळी रचली. त्याला आर अश्विननेही उत्तम साथ दिली आणि नाबाद 39 धावा केल्या. या दोघांनी 43 षटकं खेळून भारताला सिडनी कसोटीत पराभवापासून वाचवलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram